वार्ताहर/किणये
बेळगुंदी येथील सरकारी आमदार आदर्श प्राथमिक मराठी शाळेला तालुका आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला. शिक्षक दिनानिमित्त गांधी भवन बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार एसडीएमसी व मुख्याध्यापकांकडे देण्यात आला. एसडीएमसी व शिक्षकांच्या प्रयत्नांतून शाळेचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती पाहून शाळेला तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, क्षेत्र शिक्षणाधिकारी दासपण्णावर, बीआरसी मेदार, आदींच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एम. के. नागण्णावर, एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा बेळगावकर, कमिटीचे सर्व सदस्य, शिक्षक उपस्थित होते.









