वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील हावर्ड मेमोरियल हायस्कूलच्या भव्य पटांगणावर पन्हाळा तालुकास्तरीय शालेय शासकीय १४,१७,१९ वर्षांखालील वयोगटातील मुले आणि मुलीच्या खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या.अत्यंत खेळीमेळीत खिलाडूवृत्ती ने दोन दिवस पार पडलेल्या स्पर्धेत तालुक्यातील शाळा मधून ६५ संघानी सहभाग घेतला होता.कोल्हापूर चर्च कौन्सिल शिक्षण समितीचे अध्यक्ष अँड. डी.डी. धनवडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अँड.राजेंद्र पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश पाटील, कोडोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रविण जाधव, सदस्य डॉ. प्रशांत जमने,अविनाश महापुरे, विकास समुद्रे, दीपक चोपडे, सालोमन गायकवाड, प्रकाश हराळे यांच्या उपस्थितीत झाले. त्यांचे स्वागत मुख्याध्यापक एस.ए. बिडकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्या संघाचा निकाल १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक- देवाळे हायस्कूल देवाळे, द्वितीय क्रमांक नेहरू विद्यामंदिर, कोतोली. मुलींमध्ये प्रथम क्रमांक – आनंदीबाई सरनोबत हायस्कूल, आसुर्ले. द्वीतिय क्रमांक – माध्यमिक विद्यालय घोटवडे, १७ वर्ष वयोगटमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक संजयसिंह माध्य. विद्यालय, दळवेवाडी, द्वितीय क्रमांक – नेहरू हायस्कूल कोतोली. मुलींमध्ये प्रथम क्रमांक- संजयसिंह माध्य. विद्यालय, दळवेवाडी, द्वीतिय क्रमांक कोडोली हाय, कोडोली, १९ वर्ष वयोगटमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक- मंदार माध्यमिक विद्यालय, पणोरे, द्वीतिय क्रमांक देवाळे विद्यालय व ज्युनि. कॉलेज, देवाळे, तर १९ वर्ष वयोगटमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक- देवाळे विद्यालय व उपनि. कॉलेज, देवाळे, द्वितीय क्रमांक- नेहरू विद्यामंदिर, कोतोली सदर स्पर्धा पार पडण्यासाठी हावर्ड हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. ए. बिडकर, क्रीडा शिक्षक प्रशांत चोपडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, तर पंच म्हणून चंद्रशेखर सुर्वे, के. वाय. पाटील, दीपक कांबळे, श्रीधर गोंधळी, प्रतिक मोरे, सतीश पाटील इत्यादी परिश्रम घेतले.









