इतरांसाठी खर्च केल्यास होणारा आनंद अधिक
अनेकदा आम्ही ज्याला सुख मानतो, त्याच्या उलटच घडत असते. लोक भरपूर पगार आणि स्वतःच्या कारकीर्दीतील यशासाठी प्रयत्न करत असतात. यालाच स्वतःचा आनंद मानून घेतात, परंतु हा खरा आनंद नसतो. तर इतरांसाठी आम्ही किती खर्च करतोय यातून आम्हाला अधिक आनंद मिळत असल्याचे एका अध्ययनानंतर म्हटले गेले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील सायन्स डायरेक्टर एममिलियाना सिमोन थॉमस यांनी चकित करणारे निष्कर्ष मांडले आहेत. 6 गोष्टींमुळे आपला आनंद वाढत असल्याचे आपल्याला वाटत असते, परंतु प्रत्यक्षात याच्या उलट घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शहरातील वास्तव्य
शहरात राहिल्याने आनंद मिळतो असे आम्हाला वाटते, परंतु शहरी जीवन तणाव आणि नापसंतीने भरलेले असते. तर अधिक मोकळय़ा वेळेने आनंद मिळत असला तरीही उत्पादकता घटत असते. अनोळखी म्हणून कारम राहिल्याने आनंद मिळत नाही, तर उलट अनोळखींशी बोलल्याने आनंद मिळत असतो. चांगले वेतन असणारी नोकरी आणि पदोन्नती मिळाली तर जीवन सहजपणे व्यतित करता येईल असे अमेरिकन नागरिकांचे मानणे असले तरीही प्रत्यक्षात असे घडत नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

मित्रांसोबत घालविलेला वेळ
कपडे, नवी कार, गॅझेट खरेदी केल्याने आम्हाला आनंद मिळत नाही, तर इतरांकरता पैसे खर्च केल्याने आनंद वाढतो. अशाच प्रकारे भौतिक गोष्टींऐवजी अनुभव अधिक आनंद मिळवून देत असतो. मोठय़ा प्रवासाऐवजी एखाद्या मित्रासोबतचा लंच आनंददायी असल्याचे एममिलियाना सिमोन थॉमस यांनी म्हटले आहे.









