कोल्हापूर :
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गत आर्थिक वर्षात हेल्मेट, सीट बेल्ट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आणि ओव्हर स्पीडच्या वाहनांवर कारवाई करत 49 हजाराचा दंड वसूल केला. 2505 वाहधारक मोबाईलवर बोलताना आढळले असून हेल्मेट कारवाईच्या सर्वाधिक 5536 केसेस आहेत. तर सर्वाधिक दंड वसुली ओव्हर स्पीडमधून झाली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येते. हेल्मेट न घालता वाहन चालवणे, सीट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, ओव्हर स्पीडने वाहन चालवणे अशा प्रकारच्या कारवाया आहेत. गतवर्षी 5,536 वाहनधारक हेल्मेट न घालता वाहन चालवताना आढळले. त्यांच्याकडून 9 लाख 24 हजार रुपयांचा दंड वसूल केला. 1,998 वाहनधारकांनी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यांच्याकडून 5 लाख 7 हजार रुपयांचा दंड वसूल केला.s. 2505 वाहधारक मोबाईलवर बोलताना आढळले तर 3349 वाहनधारकांनी वेगाची मर्यादा ओलांडली आहे. या सर्वांवर कारवाई करुन 49 लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
- एप्रिल 2024 ते मार्च 2025
एकूण केसेस निकाली केसेस दंड वसुली (लाखात)
हेल्मेट 5536 1320 9.24
सीट बेल्ट 1998 507 5.07
मोबाईल 2505 231 2.31
ओव्हर स्पीड 3349 1636 32.88








