वाईन शॉपमध्ये दारू पिण्यास मज्जाव असल्याने केवळ पार्सल नेण्याचा ओघ वाढला : शेतात बाटल्यांचा खच
वार्ताहर /सांबरा
सध्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वाईन शॉपमध्ये दारू पिण्यास मज्जाव करण्यात आला असून केवळ पार्सल स्वरूपात दारू देण्यात येत आहे. या प्रकारामुळे तळीरामांची अडचण होत असून तळीरामानी आपला मोर्चा शेती शिवाराकडे वळविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तळीराम दारू ढोसल्यानंतर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास आदि कचरा तेथेच टाकून जात आहेत. त्यामुळे या प्रकाराचा शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱयांना नाहक त्रास
शहरासह ग्रामीण भागातील वाईन शॉपमध्ये केवळ पार्सल दारू देण्यात येत आहे. वाईन शॉपमध्ये दारू पिण्यास बंदी घालण्यात आल्याने तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. शहर व ग्रामीण भागात दररोज दारू ढोसणाऱया नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तळीराम दारू पिण्यासाठी खुल्या शेतीशिवारांची निवड करत आहेत. काही अतिउत्साही मद्यपी दारू पिल्यानंतर तिथेच दारूच्या बाटल्या फोडणे, कचरा अस्ताव्यस्त टाकून देणे आदि प्रकार करत आहेत.
आळा घालण्यी मागणी
य् ाा प्रकारामुळे शेतकऱयांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी काचेच्या बाटल्या फोडणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. फोडलेल्या काचामुळे शेतकऱयांना व जनावराना इजा होण्याचा संभव आहे. यासाठी अशा प्रकारांवर आळा घालण्याची मागणी करण्यात येत आहे.









