काबूल
तालिबानने महिलांसाठीच्या ब्युटी सलून्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अफगाणी महिला आणि युवतींच्या अधिकार आणि स्वातंत्र्यावरील हा नवा निर्बंध असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने मंगळवारी म्हटले आहे. काबूलसमवेत सर्व प्रांतांमधील महिलांसाठीच्या ब्युटी सलून्स बंद करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत.









