परप्रांतीय तरूणांना हाकलले
सांगे : गेल्या काही दिवसापासून पाऊस जोरात पडत असल्याने नधा दुतडी भरून वाहत असल्याने सांगे येथिल संगमेश्वरस्तळी पाण्याची पातळी भरीच वाढली आहे. अशातच भर पाण्यात परप्रांतीयांकडून सेल्फी घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालणारा हा प्रकार आहे. स्थानिकानी हा प्रकार पहिल्यावर लगेच हस्तक्षेप करून या परप्रांतीय तऊणांना तेथून हाकलून लावले. खुटीवाडा येथील संगमेश्वर येथे त्रिवेणी संगम होत असून तीन नधाच्या मध्यभागी संगमेश्वराचे लहान घुमटीवजा मंदिर आहे. नदीचा प्रवाह वाढल्यांने येथिल रंगमंच, पाय्रया सर्वकाही पाण्याखाली गेले आहेत परप्रांतीय तऊण थेट स्कूटर पाण्यात घेऊन गेले आणि कठदयावर उभे राहून सेल्फी घेऊ लागले. समजा पाय घसरला तर थेट पाण्यात पडण्यावाचुन गत्यतर नाही अशी स्थिती होती. त्यामुळे सल्फीच्या नादात प्राण गमवण्याची वेळ येवू शकते. हे तऊण दारूच्या नशेत होते अशी माहिती मिळाली. सांगे नगरपालिकेने तसेच सांगे पोलिसांनी सर्तक राहण्याची गरज व्यक्त होत आहे. सांगेत परप्रांतीय मजुराची संख्या वाढली असून बाजारात दारू पिऊन फिरणे, भांडणे असे प्रकार पहावयास मिळतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पोलिसांनी सांगे बाजारात फेरफटका मारून अशा प्रकारावर वचक ठेवण्याची मागणी होत आहे.









