ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यपाल भागात सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे नेहमीच काही न काही वक्तव्य करून वाद ओढवून घेतात. आता पुन्हा एकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते पवार – डॉ. गडकरींपर्यंत हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य केलं आहे. यावर संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chhatrapati) थेट राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) केलीय.
परभणीमध्ये पत्रकारांनी राज्यपालांच्या या विधानाचा संदर्भ देत संभाजीराजेंना प्रश्न विचारला. त्यावर संभाजी राजेंनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे सातत्याने अशी बडबड का करतात? हा प्रश्न मला पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
हे ही वाचा : शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श; तर गडकरी, पवार आताचे आयडॉल – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
काय म्हणाले संभाजीराजे ?
“हे राज्यपाल असं का बडबडतात मला अजूनही समजत नाही. मी तर म्हणतो यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या, मी हात जोडून पंतप्रधानांना विनंती करतो की यांना प्लीज.. प्लीज म्हणतोय मी प्लीज… प्लीज यांना बाहेर पाठवा. अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नकोय. जी व्यक्ती महाराष्ट्र वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच बाकी महापुरुषांबद्दल तसेच संतांची भूमी असताना इतकं घाणेरडं बोलतात. इतका घाणेरडा विचार घेऊन येऊ कसे शकतात? यानंतरही यांना राज्यपालपदी ठेवतात तरी कसं?” असं म्हणत आपला संताप व्यक्त केलाय.
राज्यपाल केश्यारी नेमकं काय म्हणाले?
औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, तुम्हाला कुणी विचारले की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.
दरम्यान याआधी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या विरुद्ध सुद्धा बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरूनही मोठया प्रमाणात वादंग झाला होता अशातच राज्यपालांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फुटले आहे.