जिल्हा पंचायत सीईओंना निवेदन
बेळगाव : आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या सेक्रेटरीवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य ग्रामीण विकास-पंचायतराज खाते जिल्हा शाखा कर्मचारी संघटनेने केली आहे. पदाधिकारी व सदस्यांनी संयुक्तपणे मंगळवार दि. 11 रोजी जि. पं. कार्यालयावर जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन दिले. आंबेवाडी ग्रा. पं. चे सेक्रेटरी नागप्पा कोडली हे 10 मार्च रोजी दुपारी गोजगेत सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची पाहणी करून परतत असताना काहींनी त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. यामुळे सेक्रेटरी कोडली भयभीत झाले असून हल्ला करणाऱ्यांची चौकशी व्हावी. सेक्रेटरी कोडली यांना न्याय मिळवून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.









