माजी मंत्री पट्टणशेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विजापूर : माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विजापूर शहर व जिह्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीच्या व्यवहारातून जनतेची फसवणूक करणाऱ्या भू माफियांना वठणीवर आणण्यासाठी याची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश देण्याचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. विजापूर शहर व जिह्यात अनेक वर्षांपासून जमीन विक्रीचे शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. केवळ काही गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून अनेक प्रकरणे निकाली निघालेले नाहीत. शेकडो लोकांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. अशी प्रकरणे मी माझ्या निदर्शनास आणून दिली आहेत. अनेक प्रकरणे खोटी कागदपत्रे तयार करून मागील सरकारच्या निदर्शनास आणूनही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात ज्यांच्या जमिनी व भूखंड गमावले आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा,जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या जमिनी व भूखंड मूळ मालकांना परत करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जगदीश मुचंडी उपस्थित होते.









