संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न
सातारा जिल्ह्यामध्ये मे 2023 मध्ये जिवितहानी झालेल्या अपघातांची संख्या 30% नी तर प्रत्यक्ष जिवितहानी 34% नी कमी झाले आहे. याचे कौतुक करुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध विभागांच्या मदतीने आणखीन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासासाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्यासह शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
खासदार श्री. पाटील म्हणाले, महामार्गावर अवजड वाहनांना जाण्यासाठी स्वतंत्र लेन तयार केली आहे. त्याच लेनमधून अवजड वाहने जातात का नाहीत याची तपासणी करावी.









