दैवज्ञ समाजातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
प्रतिनिधी
बांदा
कणकवली येथे चोरीची घटना झाल्यामुळे ती बांदा शहरात व परिसरात होता नये त्यासाठी सुरक्षितता आणि खबरदारीसाठी उपाय योजना करावी अशी मागणी बांदा दैवज्ञ समाजातर्फे बांदा सहा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. पावसाळा सुरु असुन पावसाची संधी घेऊन बाजारपेठेत चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यातच कणकवली येथे आठवडाभरापूर्वी ज्वेलरी शॉप फोडून चोरट्याने मोठा ऐवज लंपास केला. त्यामुळे अशी घटना बांदा बाजारपेठ व परिसरात अशी घटना होता नये यासाठी आज दैवज्ञ समाजातर्फे बांदा पोलीस सहा निरीक्षक गजेंद्र पालवे यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष संतोष चिंदरकर, उपाध्यक्ष प्रशांत उर्फ बाबू चिंदरकर यांनी सुरक्षा व गस्त वाढविण्यासाठी चर्चा केली. शहरात रात्रीच्यावेळी गस्तीच्या फेऱ्या वाढवा तसेच मोटरसायकल ने गस्त घालावी. जेणेकरून चोरी सारख्या घटना घडणार नाहीत. यावेळी सहा निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी आम्ही नेहमी गस्त घालत असुन विशेष लक्ष घालून गस्त वाढवू असे पोलिसांनी सांगितले. यावेळी सहा पोलीस उपनिरीक्षक शिवराज झाजुर्णे उपस्थित होते.









