यंदा उन्हाळा तीव्र उष्णता जाणवायला लागली आहे. उष्णता वाढली की, अनेक आजार देखील होतात. अशावेळी तब्येतीची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणे असा सल्ला डॉक्टर देतात. आज आपण उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात.
या काळात शक्यतो मुगाची खिचडी किंवा वरण-भात असे पचायला हलके असणारे जेवण असावे, तसेच सर्व पालेभाज्यांचे आहारात प्रमाण वाढवावे.
टरबूज, खरबूज, कलिंगड,संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.
नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.
उन्हाळ्यात शक्यतो मांसाहार टाळावा.
उन्हाळ्यात घामाच्या रुपाने उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे आतून व बाहेरून शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे वेळोवेळी थंड पाणी पीत राहावे.
फ्रीज मधील पाण्यापेक्षा माठातील पाणी प्यावे . उन्हातून आल्यानंतर तत्काळ पाणी पिणे टाळावे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









