कोल्हापूर
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. थंड हवामानामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचेला खाज येणे, लालसरपणा तर कधीकधी टोकदारपणा अशा समस्या उद्भवतात. यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी
- हिवाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. थंड हवामानामुळे पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते. अशात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी
- प्यायले. तर त्वचा कोरडी पडण्यामागचे मुख्य कारण दूर होईल.
- आहारात बदाम, सुकामेवा, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा. यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते.
- हिवाळ्यात नियमितपणे मॉइश्चरायझरचा वापर केल्यास, त्वचा हायड्रेटेड राहते. हिवाळ्यात त्वचेसाठी तेलयुक्त मॉइश्चरायझर जास्त
- उपयुक्त ठरतात. नैसर्गिक घटकांनी बनवलेली उत्पादनेही उपयुक्त असतात.
- गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ न करता कोमट पाण्याने अंघोळ करा. कारण गरम पाणी त्वचेला अधिक कोरडे करते.
- फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही सनस्क्रिनचा वापर करा. या दिवसातील सुर्याची किरणे त्वचेवर परिणाम करु शकतात.
- आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर केल्याने त्वचेवरील मृत पेश निघून जाऊन त्वचा तजेलदार होते.
- हिवाळ्यात सहसा अनेकांचे ओठ कोरडे पडतात.त्यासाठी लिप बाम वापरा. नंतर त्यावर मऊसर मॅट किंवा सॅटिन फिनिश लिपस्टिक वापरा.
- हिवाळ्यात जड फाउंडेशन न वापरता लिक्विड किंवा क्रीम बेस फाउंडेशन वापरा. यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळू शकते.
- नियमित झोप आणि मानसिक स्वास्थ्य देखील त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी योग्य पद्धतीने घेतल्यास त्वचा कोरडी आणि निर्जिव न वाटता तजेलदार आणि निरोगी दिसून येईल.









