हिवाळा सुरु होताच त्वचेची समस्या जाणवू लागते. ओठ फुटणे,पाय फुटणे,त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी त्वचेची नेहमीपेक्षा जास्त काळजी घ्यायला हवी.चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची कशी काळजी घ्यावी.
हिवाळ्यात त्वचा मऊ राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडीलोशन वापरावे.
या दिवसांत कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते. त्यामुळे जास्त कडक पाण्याने अंघोळ करू नये.
बाहेर जाताना त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोशन लावावे. शक्य असल्यास त्यावर ग्लोज घालावेत.
स्वेटर, कानटोपी गाडी चालविताना वापरा.थंडीमुळे हाताच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड ग्लोजही वापरावे.
थंडीत पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाबपाणी टाकून त्यात थोडा वेळ पाय ठेवावेत.
पाय कोरडे पडू नयेत म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने लोशन अथवा क्रीम लावावे.
थंडीच्या दिवसांमध्ये ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते. ओठ कोरडे पडल्याने त्याला भेगा पडू शकतात. ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे. किंवा ओठांना लोणी, दुधाची साय किंवा तूपदेखील तुम्ही लावू शकता.
थंडीच्या दिवसात घरातील फरशी अतिगार होते. याचा त्रास देखील होतो. त्यामुळे हिवाळ्यात घरी स्लीपर्स चा वापर करावा.
Previous Articleकसबा बीड येथे होणार सुसज्ज ग्रामसचिवालय
Next Article दीपावली निमित्त शहरात 18 फुटाचा आकाश कंदील









