हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. याशिवाय थंडीचा परिणाम केसांवरही जाणवू लागतो.हवेतील गारव्यामुळे केस कोरडे होणे ,केस गळणे अशा समस्या निर्माण होतात.तसेच केसांची चमकही जाते.अशावेळी केसांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.आज आपण हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आपल्या डोक्याचं रक्ताभिसरण वाढणं गरजेचे असते. यासाठी हिवाळ्यात ड्रायफ्रुटस खावेत. यातील पोषक तत्त्वांमुळे केसांचे आरोग्य सुधारते.
केसांना तेल लावणे देखील खूप महत्वाचे आहे. हे केवळ रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करत नाही तर केसांना पोषण देखील देते.यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा तेलाने मसाज करावा. यासाठी खोबरेल तेल, बदाम तेलाचा वापर करावा.
हिवाळ्यात बऱ्याच जणांना कोंड्याची समस्या जाणवते. केसातील कोंड्यावर कोरफडीचा रस गुणकारी ठरतो. अंघोळीच्या आधी कोरफड किंवा लिंबाचा रस केसांना लावल्याने कोंडा निघून जातो.
कितीही थंडी असली तरी केस हे कोमट पाण्यानेच धुवावेत. कारण केस धुण्यासाठी गरम पाणी वापरल्याने केस कमकुवत होतात.
केस धुताना सौम्य शाम्पू वापरा ज्यामध्ये रसायने नसतात. त्यात सल्फेट नसावे.
ओले केस कधीही बांधू नये कारण त्यामुळे केस तुटतात.
हिवाळ्यात केसांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या मोड आलेली कडधान्ये ,दूध चिकन मासे यांचा समावेश असावा.
मग या हिवाळ्यात त्वचेसोबत केसांचीही काळजी घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









