थंडीत पायांच्या अनेक समस्या वाढतात.पायाची त्वचा कोरडी पडणे,पायांना भेगा पडणे ,भेगांतून रक्त येणे यामुळे त्रासही होतो तसेच पायांचे सौंदर्य देखील बिघडते.म्हणूनच हिवाळ्यात पायांचीही काळजी घेणं आवश्यक आहे.पण काही घरगुती उपायाने पायांच्या भेगांवर उपाय होऊ शकतो.
1.रोज रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून मॉईश्चराईज्ड क्रिम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.
2.थंडीच्या दिवसात पायांसाठी नेहमी सॉक्सचा वापर करावा.
3.पायाच्या भेगांना कडूलिंबाच्या पाल्याचा रस लावल्यास भेगा कमी होतात.
4.चंदन उगळून भेगांमध्ये त्याचा लेप लावल्याने उपयुक्त ठरते. यामुळे टाचा मऊ होतात.
5.ग्लिसरिन, गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यानेही भेगा कमी होतात.
6.घरातील फरशी अतिगार होत असेल तर घरातदेखील स्लीपर्स चा वापर करावा.
7.अंघोळ झाल्यानंतर मोहरीच्या तेलामध्ये हळद घालून भेगांवर लावल्यास भेगा लवकर भरतात.
8.ऑलिव्ह ऑइल हे त्वचेसाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे थंडीत टाचांना पडणाऱ्या भेगांसाठी त्याचा निश्चितच उपयोग होतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









