गेल्या काही दिवसांपासून राज्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. डोळे येणे किंवा कंजंक्टिवायटिस या डोळ्यांच्या विकाराने अनेक जण त्रस्त आहेत. विशेषतः पावसाळ्यात हा रोग आढळून येतो. बॅक्टेरिया किंवा व्हायरस सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार फैलावतो. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी डोळ्यांची काळजी घ्यायला हवी.
आय फ्लू’पासून असा करा बचाव
हाताची चांगली स्वच्छता ठेवा आणि हात वारंवार धुवा.
डोळ्यांचा मेकअप करणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांशी शेअर करणे टाळा.
तुमचा टॉवेल दुसऱ्यांना वापरायला देऊ नका.
डोळ्यांसाठी वापरली जाणारी कॉस्मेटिक प्रोडक्ट्स कालबाह्य झाल्यानंतर वापरू नका.
आपले टॉवेल वारंवार धुवा आणि स्वच्छ कपडे घाला.
आय फ्लू झालेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका.