जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : मलप्रभा सहकारी साखर कारखान्यामध्ये सरकार नियुक्त संचालक म्हणून नियुक्ती केल्यानंतर कारखान्यामध्ये गेले असता आपणाला कोंडून घालण्यात आले. याचबरोबर धमकीदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे मला संरक्षण द्यावे, अशी मागणी भारतीय कृषक समाज संघटनेचे अध्यक्ष सिदगौडा मोदगी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मलप्रभा सहकारी साखर कारखान्यामध्ये बराच गैरव्यवहार झाला आहे. तो गैरव्यवहार काढण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिला आहे. त्यानंतर आता सरकारने संचालक म्हणून नियुक्त केल्यानंतर मी त्यासाठी तेथे गेलो होतो. मात्र, त्या ठिकाणी संचालकांनी व इतर काही कर्मचाऱ्यांनी मला कोंडून घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिदगौडा मोदगी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









