अंजुमन-इ-इस्लाम संघटनेची मागणी
बेळगाव : नाझिया इलाही खान नामक व्यक्तीने मुस्लीम विरोधात वक्तव्य चालविले असून त्याच्यावर कायदेशीर करावाई करावी, अशी मागणी अंजुमन इ इस्लाम बेळगाव या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संघटनेच्या सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. नाझिया इलाही खानने मुस्लीम समाज, कुराण, अल्लाह यांच्याविरोधात वक्तव्ये केली आहेत. यामुळे असंख्य मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. मुस्लीम धर्मशास्त्राचा अभ्यास न करताच केलेल्या वक्तव्याबद्दल खानवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. मुस्लीम समाजाबद्दल गैरसमज पसरविल्यास कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अंजुमन इ इस्लाम संघटनेने निवेदनातून दिला आहे.निवेदन देताना मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









