कर्नाटक दलित संघर्ष समितीची निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : मागासलेल्या शोषित समाजाला त्यांचे हक्क, न्याय व स्वतंत्र मिळवून देण्याचा संविधानाच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्त करणाऱ्यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी कर्नाटक दलित संघर्ष समितीने राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नुकताच लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्याबरोबर देशात विविध ठिकाणी संविधानाबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्ये केली जात आहेत. अशांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. संविधानाला धक्का पोहोचविण्याचे काम काहीजण करत आहेत. अशांवर कारवाई व्हावी.









