हिंदू जनजागृती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव ; गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांच्यावतीने न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांवर बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये पॉप्युलर फ्रंट या संघटनेच्या लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील खटला धारवाड न्यायालयात सुरू आहे. यामधील अटक केलेल्या संशयितांच्यावतीने अॅड. पी. कृष्णमूर्ती हे काम पाहत आहेत. ते विश्व हिंदू परिषदेमध्ये कार्यरत आहेत. मडकेरी येथे विश्व हिंदू परिषदेच्या आयोजित केलेल्या बैठकीला ते हजर होऊन घरी परतत होते. त्यावेळी चटळ्ळी गावाजवळ त्यांच्यावर फायरिंग करण्यात आले आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत. यामध्ये वरील संघटनेचा सहभाग असल्याचा संशय असून तातडीने या प्रकरणाचा तपास करून कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. य् ाावेळी हिंदू जनजागृती संघटनेचे सुधीर हेरेकर, अॅड. श्यामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. चिदंबर होनगेकर, अॅड. जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.









