कोल्हापूर :
कळंबा तलावातील पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली. तसेच पाणलोट क्षेत्रातील वाढती बांधकामे विशेषत: लॉजिंग बंद करण्याच्या मागणीवरून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी संबंधित घटकांवर कारवाई करण्याची आश्वासन ग्रामपंचायतीने दिले. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर कळंबा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. सरपंच सुमन गुरव या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रभारी ग्रामसेवक राजेंद्र भगत यांनी सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला.
यावेळी कळंबा तलावात मिसळणारे सांडपाणी थांबण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत तसेच पाणलोट क्षेत्रामधील लॉजिंग बोर्डिंग हॉटेल मंगल कार्यलाय तसेच तलावाला प्रदूषित करणाऱ्या घटकांवर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी यासंह अनके मुद्यांवर ग्रामस्थांनी या सभेमध्ये प्रश्न उपस्थित केले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा झाली.
दरम्यान या सभेवेळी ग्राममहसूल अधिकारी सचिन पाटील व कृषी अधिकारी नामदेव गिरीगोसावी नागरिकांना व शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती दिली. व त्याचा लाभ कसा घ्यावा याचे प्रबोधन केले यावेळी आरोग्य विभागामार्फत गाव टीबी मुक्त राहावे यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी प्रकाश टोपकर यांनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण बाबत ग्रामपंचायतीने संबंधितांवर काय कारवाई केली. तसेच पाणलोट मध्ये व्यावसायिकांना व उद्योगांना परवानगी व न हरकत दाखले कसे काय दिले असही प्रश्न यावेळी उपस्थित केला. यावेळी सदस्य दीपक तिवले यांनी टोपकर यांना सांगितले की पाणलोट क्षेत्रातील जमिनी प्राधिकरणाच्या अधिपत्यखाली येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी अथवा दाखले दिले नाहीत तसेच ग्रामपंचायतीकडून पाणलोट क्षेत्रातील तलावाला प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मंगल कार्यालय हॉटेलमधील सांड पाणी थेट तलावात मिसळत आहे त्यामुळे तलावातील जल साठा प्रदूषित झाला आहे. त्यामुळे तलावातील प्रदूषण थांबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काय प्रयत्न करणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
यावेळी उपसरपंच संदीप पाटील उदय जाधव , विकास पोवार, स्वरूप पाटील, सोनल शिंदे,रोहित मिरजे, रोहित जगताप, पूनम जाधव, वैशाली टिपूगडे, स्नेहा जाधव, छाया भवंड, मीना गौड, संगीता माने यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
- बारा ठराव मंजूर
ग्रामसभेमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे बाल विवाह प्रतिबंध, दिव्यांग लाभार्थ्यांना निधी देणे यासह बारा ठराव सभेत मंजूर करण्यात आले. कळंबा गावामध्ये दैनंदिन अर्धा टनहुन अधिक गावातून घनकचरा संकलित केला जातो यावर प्रक्रिया करण्यासठी व गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासठी दोन प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासना कडे प्रस्ताव पाठवण्याचा ठराव ही यावेळी ठराव मंजूर करण्यात आला. तसेच गावातील शंभर टक्के घरफळा व पाणीपट्टी वसूल करणे, महात्मा गांधी रोजगार हमीबाबत चर्चा करणे तसेच सिंगल युज प्लास्टिक वर गावात बंदी घालणे त्याचबरोबर विविध शासकीय लाभार्थ्यांची निवड करणे आमचं गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखडा ठराव मंजूर करण्यात आले.








