अन्यथा ११ सप्टेंबरला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
न्हावेली / वार्ताहर
आपल्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या दोघां पोलिसांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करुन निलंबनाची कारवाई करण्याची मागणी न्हावेली येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी केली आहे. ४ सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न केल्यास ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा श्री.पार्सेकर यांनी दिला आहे.
पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीचा अनाधिकारी वापर करुन आपली मॅक्झिमो प्लस चार चाकी गाडी बेकायदेशीररित्या जप्त केली.यामुळे आपले १९ महिन्याचे सुमारे ९ लाख आणि मेंटेनन्सचे मिळून १३ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून चारचाकी गाडी बेकायदेशीररित्या नेऊन पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठेवली आहे त्यामुळे १९ महिन्याचे सुमारे ९ लाख आणि मेंटेन्सचे मिळून १३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.असा आरोप श्री.पार्सेकर यांनी केला आहे.तत्कालीन पोलिस अधिकारी डुमिंग डिसोजा याच्या वेतनातून ही रक्कम वसूल करुन त्यांना व सातार्डा बीटचे पोलिस हवालदार गुरुनाथ नाईक यांना सेवेतून निलंबित करुन त्यांची विभागीय खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करावी,अन्यथा ११ सप्टेंबरला जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणचा इशारा न्हावेली येथील सुंदर पार्सेकर यांनी दिला आहे.याबाबतचे लेखी पत्र त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक,पोलिस महासंचालक,तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिले आहे.









