आम आदमी पार्टीचे शाहूपुरी पोलिसांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील सदर बाजार, विचारे माळ या परिसरामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये अवैद्य व्यवसायांमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे या परिसरातील तरुण या अवैध व्यवसायामध्ये गुंतत चाललेले आहेत. परिणामी या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. समाजविरोधी अवैध व्यवसायांवर तत्काळ कारवाई करून हे व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण कागलकर यांना देण्यात आलेश.
लवकरात लवकर मोहीम राबवून या ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात येतील, असा आश्वासन यावेळी कागलकर यांनी शिष्टमंडळाला दिला आहे यावेळी आम आदमी पार्टीचे महासचिव अभिजीत कांबळे, सचिव समीर लतीफ, शहर संघटक विजय हेगडे, शहर संघटक कोळी, युवा उपाध्यक्ष मयूर भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleमुंबईत मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त केला पाहीजे…देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्ला
Next Article आजचे भविष्य गुरूवार दि. 18 जानेवारी 2024









