कर्नाटक राज्य लोककला पदव्युत्तर-संशोधक महासंघाची आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : कर्नाटक विद्यापीठातील कुलगुरु, अध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र उच्च शिक्षणमंत्री एम. सुधाकर यांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. तातडीने या बेकायदेशीर नियुक्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य लोककला पदव्युत्तर आणि संशोधक महासंघातर्फे गुरुवारी विधानसौध परिसरात करण्यात आली आहे.या बेकायदेशीर नियुक्तीबाबत कर्नाटक राज्य लोककला पदव्युत्तर आणि संशोधक संघातर्फे मागील दीड वर्षांपासून लढा सुरू आहे.
कर्नाटक राज्य समता सैनिक संघ, कर्नाटक राज्य दिव्यांग संघटना, कर्नाटक राज्य शिक्षक मंच, कर्नाटक विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शिवाय याबाबत योग्य कागदपत्रांची पूर्तता करून कारवाईची मागणीही केली आहे. उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी व उच्च शिक्षणमंत्र्यांची कुलगुरु चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. यामुळेच कुलगुरु, अध्यापक आणि शिक्षकांची बेकायदेशीरपणे नियुक्ती झाली आहे. अशा बकायदेशीर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









