मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मेडिकल ऍन्ड सेल्स रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून आम्ही गेली अनेक वर्षे काम करत आहे. 25 ते 30 वर्षे काम करूनदेखील आता काही कंपन्या कामावरून कमी करू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असून सदर कंपन्यांना योग्य ती सूचना देवून कोणत्याही कामगाराला कमी करू नये, यासाठी सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी कर्नाटक राज्य मेडिकल ऍण्ड सेल्स रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कामगारांची अचानकपणे इतरत्र बदली केली जात आहे. त्या ठिकाणी जाऊन काम करणे अशक्मय आहे. कोणताही भत्ता नाही. कामाच्या वेळेवर मर्यादा नाहीत. त्यामुळे आमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने याबाबत योग्य ती नियमावली लागू केली पाहिजे. अन्यथा भविष्यात बेरोजगारी वाढण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, सेपेटरी प्रसाद देसाई, खजिनदार सुजय पाटील, सदाशिव बापट, जॉईंट सेपेटरी मंगलदास मेस्ता, विठ्ठल बाळेकुंद्री,
मॅकलाईटस्चे राज्य अध्यक्ष सुधीर बिर्जे यांच्यासह औषध प्रतिनिधी उपस्थित होते.









