भारतीय ग्राहकांना लवकर मिळणार आयफोन ः 1100 कोटींची होणार गुंतवणूक
वृत्तसंस्था/ चेन्नाई
तैवानमधील कंपनी पेगाट्रॉन यांनी चेन्नईमध्ये आयफोन निर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. ऍपलच्या आयफोन निर्मितीचे कार्य भारतामध्ये फॉक्सकॉन व विस्ट्रॉन या कंपनीकडून सुरू आहे. पेगाट्रॉनच्या नव्या कारखान्याचा शुभारंभ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालीन व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत झाला.
आयफोनची निर्मिती
या निर्मिती कारखान्याकरिता कंपनीने 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित केली आहे. अलीकडेच ऍपलच्या फॉक्सकॉनच्या चेन्नईतील कारखान्यामध्ये आयफोन 14ची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. अशा रितीने चीन आयफोन निर्मिती केंद्रे आपल्या देशाव्यतिरिक्त भारतासह आशियाई देशांमध्ये सुरु करण्यासाठी उत्सुक आहे.
‘मेड इन इंडिया’ला बळ
भारतातच आयफोनची निर्मिती झाल्यामुळे वितरणासाठी लागणारा वेळ आपसूकच कमी होणार असून भारतीय ग्राहकांना मेड इन इंडिया अंतर्गतचा त्यांचा आवडता आयफोन मिळण्यासाठी जास्त कालावधी थांबावे लागणार नाही.









