Taiwan : जगातील सर्वात स्वतंत्र समाजांपैकी एक तैवान देश आहे. मात्र ‘वन चायना वन पॉलिसी’ अंतर्गत चीन हा तैवानला आपला भाग मानतो. त्यामुळे तैवानने कोणत्याही देशासोबत संबंध ठेवण्याला चीनचा विरोध आहे. अशातच चीनचा विरोध झुगारत अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी काल (ता. ३ ऑगस्ट) रोजी तैवानचा दौरा पूर्ण केला आहे. यानंतर चिनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, चिनी लष्कराच्या 20 हून अधिक लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केला आहे. तर तैवानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वेबसाइट काही काळासाठी हॅक झाली होती. चीनच्या हॅकर्सने हे हॅकिंग केले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर सध्या तैवानमध्ये सायबर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्सना सायबर हल्ल्याचा फटका बसला होता. आणखी तीन रशियाच्या हॅकर्सनी या वेबसाइट हॅक केल्याचं काही अधिकाऱ्यांचं मत आहे.
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरतील असेही बोलले जात आहे.
काय आहे चीन आणि तैवान वाद?
चीन आणि तैवान या दोन देशांमधील वाद खूप जुना आहे. 1949 पासून कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग स्वतःला एकच देश मानतात. चीन अजूनही तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वतंत्र देश असल्याचे सांगतो. या देशांमधील वाद दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला. 1940 मध्ये माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने कुओमिंतांग पक्षाचा पराभव केला. त्यानंतर कुओमिंतांगचे लोक तैवानमध्ये स्थायिक झाले.
Previous ArticleKolhapur; राधानगरी येथे युवकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Next Article बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून मोहनराज के. पी.









