Browsing: #loptop

बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने अनुसूचित जाती-जमातीतील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र, चौकशीअंती डीसीआरईने महानगरपालिकेला क्लिन चिट दिली आहे. महानगरपालिकेच्यावतीने एससी-एसटी समाजातील अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना महापालिकेकडून लॅपटॉप दिले जात आहेत. मात्र, सदर लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. या कथित घोटाळ्याची चौकशी डीसीआरईकडून केली जात होती. मात्र, सदर निविदा प्रक्रियेत कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा क्राईम रेकॉर्ड इन्व्हेस्टिगेशन विभागाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. तसेच खरेदीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा कोणताही सहभाग नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. लॅपटॉपच्या एमआरपी दराव्यतिरिक्त अतिरिक्त दराने लॅपटॉपची खरेदी करण्यात आली आहे, असा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी केला होता. यावेळी लॅपटॉपची किंमत कमी असली तरी त्यामध्ये डाऊनलोड करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरसाठी अतिरिक्त पैसे देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांकडून बैठकीत सांगण्यात आले होते. मात्र, तक्रारदारांच्या आरोपांना समर्थन देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. निविदा आणि पुरवठा प्रक्रिया नियमानुसार पार पडली आहे व त्यात कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे, असे डीसीआरईचे पोलीस निरीक्षक रणजित गिल यांच्या अंतिम अहवालात नमूद केले आहे.

मुंबई : शिओमी कंपनी भारतात आपले लॅपटॉप्स सादर करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. यासंदर्भात कंपनी तयारी करत असल्याचे सांगण्यात येते.…