Browsing: #corona

प्रतिनिधी / सांगली जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा समुह संसर्ग वेगाने वाढत चालल्याने दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहेत. वेळेत…

प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 671 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.…

प्रतिनिधी / कुर्डुवाडीकुर्डुवाडी शहरात गेली पाच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे नगरपालिकेचे कोविड योद्धाच कोरोनाच्या विळख्यात सापडले असून आज शहरात…

प्रतिनिधी / सातारा जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 9…

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार हवेतून होत असल्याच्या शास्रज्ञांच्या अभ्यासावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर भवतालची हवा विषाणूमुक्त करण्यासाठी अनेक उपकरणे विकसित होऊ लागली. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आयआयटी, कानपूरच्या इमेजरी विभागाने एक स्वदेशी डिव्हाईसची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने 15 मिनिटात दहा फुटाची खोली विषाणूमुक्त करता येऊ शकते. हे एक स्मार्टफोन संचलित हँडी अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्शन हेल्पर असून या यंत्राच्या मदतीने लोक आपल्या आजूबाजूचे वातावरण विषाणुमुक्त करू शकतात.  शुद्ध यंत्राच्या मदतीने हॉटेल, मॉल, शाळा, ऑफिस, घर आदी ठिकाणची हवा कोरोनासह अन्य विषाणूंच्या संसर्गापासून मुक्त करता येऊ शकते.  शुद्ध डिव्हाईस वापरण्यासही सुलभ आहे. या यंत्रामध्ये 15 वॅटचे सहा अल्ट्राव्हायोलेट लाईटस असून ते लांबून नियंत्रित करता येऊ शकतात.  एक अँड्रॉईड ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून स्मार्टफोनच्या मदतीने शुद्ध हे यंत्र चालू अथवा बंद करता येते. तसेच त्याची गती आणि जागा देखील नियंत्रित करता येऊ शकते.

बोरगाव / वार्ताहर कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बहे ग्रामपंचायतीने शुक्रवार २८ ऑगस्ट ते…

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जागतिक पातळीवर हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची जनुकीय संरचना समजून घेण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहेच. त्यातून नवीन माहिती समोर येत आहे. अशीच नवी माहिती कोरोना विषाणू संदर्भात समोर येते आहे. सायन्स जर्नलमध्ये याविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा आकार बदलतो आहे.  संसर्गानंतर कोरानाच्या स्पाईक प्रोटिनचा आकार रॉडसारखा होतो आहे, असा दावा केला आहे अमेरिकेतील बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलच्या संशोधकांच्या चमूने.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूबाबत मिळालेल्या या नव्या माहितीमुळे कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक लस तयार करणार्या वैज्ञानिकांना मदत होईल.  यानिमित्ताने आधी स्पाईक प्रोटिन म्हणजे काय हे पाहूया.  कोरोना विषाणूच्या बाहेरच्या पृष्ठभागावर मुकुटाप्रमाणे दिसणारा जो भाग आहे, तिथून विषाणू प्रोटिन अर्थात प्रथिन बाहेर काढतो. त्याला स्पाईक प्रोटिन असे म्हटले आहे. या प्रोटिनपासूनच संसर्गाची सुरूवात होते.  हे प्रोटिन व्यक्तीच्या एन्झाईम्स एसीई2 रिसेप्टरला चिकटते आणि शरीरापर्यंत पोहोचते. त्यानंतर आपली संख्या वाढवून संसर्ग वाढवते.  एखाद्या व्यक्तीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग होतो तेव्हा शरीरात संसर्ग पसरवण्यासाठी या स्पाईक प्रोटिनच्या मदतीने पेशींना जखडून ठेवतो. पेशींना संसर्ग झाल्यानंतर विषाणू आपली संख्या वाढवायला सुरूवात करतो, परिणामी रूग्णाची अवस्था नाजूक होऊ लागते.  बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे संशोधक डॉ. बिंग चेन आणि त्यांचा गट या विषाणूवर संशोधन करत आहे. त्यांच्या गटाने क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमधून हा विषाणू पाहिला असता अनेक गोष्टी समोर आल्या. संशोधकांच्या असे लक्षात आले की स्पाईक प्रोटिन त्याचा आकार बदलतो आहे.  संसर्ग होण्याआधी या स्पाईक प्रोटिनचा आकार वेगळा आहे आणि संसर्गानंतर त्याचा आकार वेगळाच दिसतो.  त्रिकोणाप्रमाणे दिसणारे हे स्पाईक प्रोटिन संसर्ग झाल्यानंतर मात्र कडक केसाच्या पिनेसारखे दिसते. विषाणूतील स्पाईक प्रोटिनमध्ये हा बदल माणसाच्या रिसेप्टरच्या संपर्कात आल्यानंतर दिसू लागतो. संसर्गानंतर प्रथिनाचा एखाद्या रॉडसारखा किंवा काठीसारखा आकार हा अँटीबॉडीजला विषाणू न्यूट्रल करण्यास मदत करू शकतो.

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू…

प्रतिनिधी / सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 443 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर…

प्रतिनिधी / पाचगाव पाचगावमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारपर्यंत पाचगावमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११५ झाली आहे तर…