कोरोना विषाणूमुळे हातांच्या स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आलं आहे. घरी आल्यावर किंवा कोणत्याही पृष्ठभागला स्पर्श केल्यावर साबणाने किमान 20 सेकंद हात…
Browsing: #Asmita
आ रओ किंवा वॉटर प्युरिफायर घेण्याच्या विचारात असाल तर काही बाबींकडे लक्ष द्या. विविध कंपन्यांच्या वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती आपण बघतो.…
जन्मजात आजारपणामुळे किंवा अपघातानंतर व्हील चेअरवरचं आयुष्य नशीबी आलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. आपण आयुष्यात खूप काही करू शकतो.…
कोरोनाचा हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कसोटीचा आहे. काहींच्या नोकर्यांवर गदा आली आहे. पगारात कपात केली जात आहे. उद्योग-व्यवसाय रूळावर…
मॉलमधल्या सौंदर्यप्रसाधनांच्या दालनातून किंवा मोठय़ा दुकानातून प्रसाधनांची खरेदी करणं खूप समाधान देऊन जायचं. मात्र टाळेबंदीच्या काळात अनेकींनी ऑनलाईन खरेदीवर भर…
पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यातही आहाराबाबत विशेष दक्षता बाळगावी लागते. या दिवसात रोगराई पसरण्याचा धोका अधिक असल्यामुळे योग्य…
कोरोना काळात कामाचे तास कमी झाल्यामुळे किंवा वर्क फ्रॉम होमच्या सुविधेमुळे हातात बराच मोकळा वेळ राहतो. या वेळेचा सदुपयोग करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ऑनलाईन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. आयआयएम, गूगल, क्वेसेरा यांसारख्या संस्थांनी कौशल्यविकास अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. तेही अगदी मोफत…हे अभ्यासक्रम तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील. आयआयएमने कॉर्पोरेट फायनान्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह बिझनेस कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम आणले आहेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी पाच आठवडय़ांपासून बारा आठवडय़ांपर्यंत असतो. गूगलने कनेक्ट वुईथ कस्टमर ओव्हर मोबाईल, इन्फ्लूअन्सिंग पीपल, इंग्लिश फॉर करिअर डेव्हलपमेंट, सोशल सायकोलॉजी, प्रमोट अ बिझनेस वुईथ कंटेंट, इंट्रोडक्शन टू सायबर सिक्योरिटी असे अत्यंत उपयुक्त अभ्यासक्रम आणले आहेत. यापैकी आवडता अभ्यासक्रम निवडून तुम्हाला भविष्या साठी सज्ज होता येईल.
हिरवळीमुळे ताण कमी व्हायला मदत होते. सध्याच्या काळात बागेत जाणं टाळलं जातंय. मॉर्निंग वॉकला जातानाही दहा वेळा विचार करावा लागतो. मग काय करायचं? तुम्ही घरीच छानशी बाग फुलवू शकता. फावल्या वेळेत हा उद्योग करता येईल. या कल्पना वापरून पहा- * घरात पडिक असलेला टब घ्या. त्यात माती घाला. रोपटी लावा. नियमित पाणी घाला. हा टब बाल्कनी, व्हरांडा किंवा घरातच उजेड असलेल्या भागात ठेवता येईल. * घरातल्या घरात आडवी बाग फुलवता येईल. यासाठी शू होल्डर घ्या. प्रत्येक कप्प्यात माती भरा, बिया पेरा. शू होल्डर अडकवण्यासाठी आणि झाडांच्या वाढीसाठी चांगली जागा हवी. शू होल्डर गार्डन हा हटके ऑप्शन आहे. * गमबूट किंवा साधे बूट कुंडी म्हणून वापरता येतील. वापरात नसलेल्या बुटांना खालच्या बाजूला भोकं पाडा, माती भरून बिया पेरा. *वापरात नसलेल्या डब्यांच्या कुंडय़ा तयार करता येतील. डब्यांच्या खाली छिद्र पाडा. डब्यांना रंगरंगोटी करून त्यात माती भरून रोपटी लावता येतील.
आपल्याला प्रत्येक प्रसंगी वेगळा पेहराव लागतो. मात्र उगाचच पैसे वाया घालवून कपाटं भरण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. बेल्टमुळे तुम्ही कोणातही पेहराव खुलवू शकता. अगदी साडीसोबतचही बेल्ट कॅरी करता येईल. पांढर्या शर्ट ड्रेसवर जाड बेल्ट लावता येईल. तुम्ही वैविध्यपूर्ण बॉटम्ससोबत प्रयोग करू शकता. पांढर्या शर्ट ड्रेससोबत लेगिंग, जीन्स किंवा स्कर्ट घालता येईल. जॅकेट्सनी तुमचा लूक खुलवा. कुर्ता, जीन्स, ड्रेस, वन पीस यापैकी कोणत्याही पेहरावासोबत जॅकेट घालता येईल. स्कार्फच्या मदतीनेही तुम्ही लूक खुलवू शकता. प्लेन, रंगीबेरंगी स्कार्फचं कॉम्बिनेशन करा. तुमचा साधा लूकही उठून दिसेल.
कोरोनामुळे जगभरातले लोक जागरूक होऊ लागले आहेत. घातक रसायनं, प्राणीजन्य घटकांच्या वापरामुळे होणार्या दुष्परिणामांची जाणीव होऊ लागल्यामुळे रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी वेगन तसंच ऑरगॅनिक म्हणजेच पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेली उत्पादनं वापरण्यावर भर दिला जात आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात हा नवा बदल अनुभवायला मिळत आहे. वेगन तसंच सात्विक आहाराला महत्त्व देणार्यांना आता वेगन सौंदर्यप्रसाधनं हवी आहेत. आपल्या मेक अप किटमध्ये नैसर्गिक घटकांनी युक्त सौंदर्यप्रसाधनं असावीत, असं अनेकींना वाटू लागलं आहे. महिलांच्या या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन बहुराष्ट्रिय कंपन्यांनीही अशी उत्पादनं बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे. मान्सून काळात त्वचेची जास्तच काळजी घ्यावी लागते. वेगन तसंच ऑरगॅनिक सौंदर्यप्रसाधनांमधली जीवनसत्त्वं तसंच खनिजं त्वचेमध्ये अगदी सहज शोषली जातात आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळतं. बॅक्टेरियाविरोधी तसंच अँटी एजिंग गुणधर्मांमुळे ही उत्पादनं महिलावर्गाच्या विशेष पसंतीस उतरत आहेत.












