खलनायिकेची भूमिका साकारणार
तब्बूने स्वत:च्या कारकीर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. यात रोमँटिक भूमिकेपासून विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांचा समावेश आहे. आता तब्बू एका चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तब्बू ही पुरी जगन्नाथकडून दिग्दर्शित चित्रपटात विजय सेतुपतिसोबत काम करणार आहे. तब्बू या चित्रपटात नकारात्मक धाटणीच्या व्यक्तिरेखेत असेल. पुरी जगन्नाथच्या या चित्रपटात ती खलनायिका असणार आहे.
तब्बूने यापूर्वी काही चित्रपटांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली असून यात ‘मकबूल’, ‘फितूर’, ‘हैदर’ आणि ‘अंधाधुन’ यासारखे चित्रपट सामील आहे. या सर्व चित्रपटांमधील तब्बूच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. याचमुळे तब्बू पुन्हा खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याने तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, परंतु यात विजय सेतुपति अन् तब्बू प्रमुख भूमिकांमध्ये असतील. तब्बू लवकरच ‘भूत बंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार, जिशू सेनगुप्ता आणि वामिका गब्बी हे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.









