बेळगाव : बेळगावची कन्या तनिष्का कारभैवने भारताचे प्रतिनिधीत्व करताना विविध देशात झालेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत एक सुवर्ण व तीन रौप्य पदके पटकावित यश संपादन केले. तनीष्का कपिल काळभैरव हिचा डी.पी शाळेतर्फे गौरव करण्यात आला. ताश्कंद येथे झालेल्या विश्व टेबल टेनिस युथ गटात तनीष्का काळभैरवने उझ्बेकिस्तानच्या अलदिना कुशानोव्हा हिचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. ताश्कंद येथे झालेल्या 13 वर्षाखालील गटात अंतिम सामन्यात भारताच्या गॉडली दानिया हिच्याबरोबर झालेल्या अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करला. तिला या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्वीडन येथे झालेल्या 13 वर्षाखालील गटात तनीष्काला मलेशियाच्या मोईत दानी हिच्याकडून हार पत्करावी लागली. तर नॉर्वे येथे झालेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत तनीष्काने अंतिम फेरीत धडक मारून मोईत दानी यांच्याकडून पराभूत झाली. पण भारतात येण्यापूर्वी तिने एक सुवर्ण व तीन रौप्यपदके पटकाविली. या यशानंतर डीपी शाळेमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तिचा खास गौरव करण्यात आला. तिला डीपी स्कूलच्या प्राचार्या सिस्टर रोझमा, सिस्टर इल्मा, क्रीडा शिक्षिका सिल्विया डिलिमा यांच्या उपस्थितीत तिला चषक देऊन खास गौरव करण्यात आला. तिने शाळेचे सातासमुद्रापार नाव केले. या पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. तिला वडील कपिल काळभैरव सोनाली काळभैरव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









