वृत्तसंस्था / इंदौर
शनिवारी येथे प्राईम टेबल टेनिस लीग स्पर्धेला प्रारंभ झाला. भारतीय टेबल टेनिस इतिहासातील या स्पर्धेने नवे दालन नवे उघडले गेले आहे. आता भारतामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीच्या टेबल टेनिस स्पर्धा नजीकच्या काळामध्ये भरविल्या जातील, अशी आशा अनेक टेबल टेनिसपटूंनी व्यक्त केली.
प्राईम टेबल टेनिस लीग स्पर्धेत एकूण 8 संघांचा सावेश आहे. या स्पर्धेतील पहिला टप्पा दोन दिवस होईल. अ गटातील झालेल्या विविध सामन्यांत किंग पाँग संघाने निंगजाचा 7-6 असा पराभव केला. ब गटातील एका सामन्यात लायन वॉरियर्सने स्पार्टेन्सचा 7-6 असा निसटता पराभव केला. क्लिपर्सने सेन्सा टीटॉनवर 7-6 अशी मात केली.









