ऑनलाईन/टीम
भारताकडे यजमानपद असलेल्या आणि कोरोनामुळे युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून भारताचा पहिला सामना पाकविरुद्ध होणार आहे. दरम्यान, १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आयसीसीनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या विश्वचषक स्पर्धेत सर्वांचं लक्ष असणार आहे तेर भारत-पाक सामन्याकडे. त्यामुळे पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी लढत होणार आहे.
आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार १७ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर यादरम्यान पहिल्या टप्प्यातील पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. यात आठ संघांचा सहभाग असणार आहे. पात्रता फेरीतील सामने ओमन येथे होणार आहेत. यातून आघाडीचे चार संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. १७ ऑक्टोबर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्या सामन्याद्वारे विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे.