पक्षाने निलंबन केले रद्द : 3 खासदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्वत:च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 119 जागांपैकी भाजपने 52 जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत टी. राजा सिंह यांचे नाव देखील सामील आहे. विशेष बाब म्हणजे उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या काही तासांपूर्वी भाजपने टी. राजा सिंह यांचे निलंबन रद्द केले होते.
टी. राजा सिंह यांना भाजपने पुन्हा एकदा हैदराबादच्या गोशमहल मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. याचबरोबर भाजपने तीन खासदारांना विधानसभा निवडणुकीकरता उमेदवारी दिली आहे. या यादीत बंदी संजय कुमार, धर्मपुरी अरविंद आणि सोयम बापू राव यांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 12 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने टी. राजा सिंह यांचे निलंबन शनिवारी रात्री रद्द केले होते. यामुळे तेव्हाच टी. राजा सिंह यांची उमेदवारी निश्चित झाली होती. टी. राजा सिंह यांना मागील वर्षी एका समुदायाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केले होते.
भाजपने एटाला राजेंद्र यांनाही उमेदवारी दिली आहे. राजेंद्र हे हुजुराबाद येथील गजवेल मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. या मतदारसंघात त्यांचा सामना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी होणार आहे. एटाला राजेंद्र हे एकेकाळी केसीआर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. रानी रुद्रम्मा रे•ाr या सिरसिला मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असणार आहेत. या मतदारसंघात त्यांना केसीआर यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री के.टी रामा राव यांचे आव्हान पेलावे लागणार आहे.









