वृत्तसंस्था/ हरारे
झिंबाब्वेमध्ये पहिल्यांदाच 10 फ्रांचायझींच्या मालकीच्या संघामध्ये टी-10 क्रिकेट स्पर्धा भरवली जाणार आहे. सदर स्पर्धा येत्या ऑगस्टमध्ये होणार असून या स्पर्धेला झिम आफ्रो टी-10 असे संबोधले जाणार आहे.
सदर स्पर्धा क्रिकेट झिंबाब्वे आणि टी-10 ग्लोबल स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विविध 10 संघांच्या फ्रांचायझींच्या उपस्थितीत या नव्या क्रिकेट स्पर्धेत अनावरण करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये विविध देशांचे क्रिकेटपटू सहभागी होत आहे. टी-10 ग्लोबल स्पोर्ट्सतर्फे संयुक्त अरब अमिरातमध्ये अबुधाबी टी-10 व लंका टी-10 या क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात आल्या होत्या. आता याच धर्तीवर झिंबाब्वेतील टी-10 स्पर्धा क्रिकेट शौकिनांना निश्चितच आकर्षित करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.









