Narendra Patil : महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार येवून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. लाखो माथाडी कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी अपेक्षा होती पण ती फेल ठरली असून, माथाडी कामगारांचा अपेक्षा भंग झाला आहे .
राज्यातील इतर प्रश्नासांरखे माथाडी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे यासाठी एक फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप माथाडी कामगारांच्या वतीने पुकारण्याचा इशारा माथाडी नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वेळोवेळी निवदने दिली आहेत. मात्र माथाडी कामगारांची अपेक्षा भंग झाला आहे. आमच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले जावे यासाठी हा संप पुकारला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
माथाडी चळवळीमध्ये 50 वर्षाचा जूना कायदा हा वेळोवेळी बदलणे किंवा त्याच्यात बदल करणे गरजेच होत. पन्नास वर्षे जुन्या माथाडी कायद्यात बदल केला जावा, माथाडी कामगार चळवळीत घुसलेल्या अपप्रवृत्ती ला आळा घालावा, माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरीत सामावून घ्यावे प्रलंबित कामगारांच्या घरांचा प्रश्न माथाडी मंडळातील अधिकारांची दादागिरीला लगाम घालण्यात यावा यासारखे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे यासाठी एक फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप पुकारण्यात येईल असे पाटील यांनी जाहीर केले असून याला पाठिंबा द्यावा असे आवाहन ही केले आहे. या संपामध्ये प्रचंड मोठी ताकद असणार आहे , हा संप यशस्वी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ३६ माथाडी मंडळे आहेत, बृहन्मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याकरीता एकूण ११ माथाडी मंडळे असून, या व अन्य मंडळाच्या पुनर्रचना झालेल्या नाहीत, त्यामुळे माथाडी कामगारांचे धोरणात्मक प्रश्न प्रलंबित आहेत. सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका करणे आवश्यक आहे. माथाडी मंडळांना ५० वर्षे झाली, कार्यालयीन सेवेतील अधिकार व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, सध्या माथाडी मंडळामध्ये कर्मचारी नाहीत, त्यामुळे कामगारांची दैनंदिन कामे होत नाहीत, माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या सेवेत प्राधान्य द्यावे म्हणून सतत मागणी केलेली आहे, त्यावर कार्यवाही होत नाही. गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची शासन व संबंधितांकडून सोडवणुक केली जात नाही, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांना नाईलाजाने लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेणे भाग पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









