प्रतिनिधी /पणजी
ओबीसी, एससी, एसटी, विद्यार्थ्यांना वैद्याकीय शिक्षणात आरक्षण नदेऊन सकरकार अन्याय करीत आहे. हा अन्याय दुर करा अशी मागणी करत ओबीसी, एससी, एसटी प्रतिनिधीनी येथली आझाद मैदानावर रविवारी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. गोमेकॉत दंत चिकित्स महाविद्यालयात पद्वीत्तर शिक्षणासाठी आरक्षण घटनेने घालून दिले आहे. तरी सुध्द गोवा सरकार ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या विद्यार्थ्यांना वंचींत ठेवत आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला.
भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, रामराव वाघ, गिरीष चोडणकर, सुदीप ताम्हणकर, समील वळवईकर, यांच्यासह आणखिन 40 लाक धरणे कार्यक्रमात उपस्थित होते.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय व गोवा दंत महाविद्यालयामध्ये गोव्यातील विद्यार्थ्यांना 50 टक्के आरक्षीत आहेत. त्यात आरक्षीत जागांमध्ये राज्यातील ओबीसी लोकांसाठी आरक्षण नसल्याने सरकार मागासवर्गीय समाजाच्या लोकांवर आन्याय करीत आहे. मागास वर्गीय लोकांसाठी 27 टक्के आरक्षणाची अमंल बजावणी करीत नसल्याचा आरोप रामराव वाघ यांनी केला आहे. याबाबत आपल्या हक्कासाठी चळवळ उभारणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
ओबीसी एससी आणि एसटी कार्यलयातील कर्मचारी तसेच पालक आणि विद्यार्थ्यांना या चळवळीत मोठय़ा संखेने सहभागी व्हावे असे आवाहन रामराव वाघ यांनी केले आहे. आरक्षणबाबत सरकार गार्भीयांने पाऊले उचलत नाही. त्यामुळे मागासवर्गातील विद्यार्थ्यांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सरकारला जागे करण्यासाठी तालुका पातळीवर सभा घेऊन लोकांना जागृत करणे तसेच सरकारचे कुटील धोरण लोकांच्या नजरेस आणून देणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे असेही रामराव वाघ म्हणाले.









