वार्ताहर/ कराड
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन पुणे संलग्न कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कराड तालुक्यातील जवळपास 300 स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा ईशारा अशोकराव पाटील यांनी दिला आहे.
अशोकराव पाटील म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना काळात शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्याचे काम केले. अध्याप मोफत धान्य वाटपाचे काम सुरू आहे. मात्र शासनाने मोफत धान्य वाटप केल्याचे कमिशन अध्याप दिलेले नाही. वास्तवीक राज्यातील इतर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना या काळातील पैसे मिळाले सातारा जिल्ह्यातील दुकानदारांना मात्र अध्याप पैसे मिळाले नाहीत.
ई-पॉझ मशीनवर येणाऱया तांत्रीक अडचणी तत्काळ दुरूस्त करूण देण्याची व्यवस्था करावी. सध्या नियमित धान्य वाटपाबरोबरच मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. नविन नियमानुसार दोन्ही धान्य वाटपाचे वेगवेगळे आंगठे घेणे बंधनकारक आहे. यामुळे दुकनदाराबरोबरच ग्राहकालाही त्रास होत आहे. ग्रामिण भागात वारंवार मशिन बंद पडत असल्याने एकाच आंगठयावर दोन्ह धान्य वाटपाची शासनाने परवानगी द्यावी.
कराड शहर व परीसरात थेट धान्याची थेट वाहतुक होत आहे. हे धान्य अत्यंत खराब येत असुन चांगल्या धान्याचा पुरवठा करण्यात यावा. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मशीनवर माल विक्रीसाठी उपलब्द करूण देण्यात यावा. ई-पॉझ मशिनला सध्या टू जी नेटवर्कचे सिमकार्ड आहे. त्यामुळे वारंवार अडचणी येत आहेत. त्यामुळे ई-पॉझ मशिनला फोर जी किंवा फाईव्ह जी सुविधा उपलब्द करूळा देण्यात यावी. ज्या केशरी ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नाही. अशा कार्डधारकांना धान्याचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या केल्याचे अशोकराव पाटील म्हणाले.
कराडमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाला सातारा जिल्हयासह सांगली, कोल्हापुर, सोलापुर पुणे आदी जिलहयातुन मोठा पाठींबा मिळत आहे. त्यामुळे शासनाने स्वस्त धान्य दुकनदारांच्या तातडीने अडचणी दुर कराव्यात अन्यथा दिवाळीनंतर राज्य पातळीवर आंदोलन करण्याचा ईशारा अशोकराव पाटील यांनी दिला आहे.









