वृत्तसस्था/ सिडनी
बिग बॅश लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने मेलबोर्न स्टार्सचा 7 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात अष्टपैलू हेन्रिक्सचे जलद अर्धशतक महत्त्वाचे ठरले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सने 19.1 षटकात 3 बाद 151 धावा जमवल्या. हेन्रिक्सने नाबाद 52, व्हिन्सेने 33 धवा जमवल्या. व्हिन्से आणि पॅटरसन यांनी 57 धावांची भागीदारी केली. व्हिन्सेने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 33 धावा जमवल्या. हेन्रिक्सने 2 षटकार आणि 4 चौकारासह 32 चेंडूत नाबाद 52 धावा तर सिल्कने 30 चेंडूत नाबाद 30 धावा झळकविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मेलबोर्न स्टार्सने 20 षटकात 5 बाद 150 धावा जमवल्या. वेबस्टरने 78, जो क्लार्कने 27 धावा जमवल्या. हेडन केरने 26 धावात 2 गडी बाद केले.









