कोल्हापूर :
शहरातील कदमवाडी येथे प्रॉपट्रीच्या कारणावरुन एका किराणा दुकानदारावर तलवार हल्ला करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रामचंद्र विठ्ठल जानकर (वय 46, रा. शिवप्रसाद कॉलनी, कपूर वसाहत, कदमवाडी, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील एका ऊग्णालयात उपचार सुरु आहेत. या तलावार हल्याप्रकरणी शाहूपूरी पोलिसांनी पाच पैकी चौघा संशयितांना अटक केली.
आदित्य अजित खोत (वय 21), त्याचे मित्र सुरज सुभाष जोंधळे (वय 28), प्रविण बाळासो काळे (वय 31), राहुल जयराम येडगे (वय 26, सर्व रा. कपूर वसाहत, कदमवाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. अजित दिनकर खोत (रा. कपूर वसाहत, कदमवाडी, कोल्हापूर) हा संशयीत अद्यापी पसार आहे. अटक केलेल्या चौघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जखमी रामचंद्र जानकर यांचे कदमवाडी येथे जानकर नावाचे किराणा दुकान आहे. त्यांच्यामध्ये आणि संशयीत अजित खोत व त्याचा मुलगा अदित्य खोत यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून प्रॉपट्रीवऊन वाद आहे. जानकर यांनी काही दिवसापूर्वी न्यायालयातून मनाई आदेश आणला आहे. या मनाई आदेशाचा राग मनात धऊन, जानकर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपले किराणा दुकान बंद करीत होते. यावेळी संशयित अजित खोत, त्याचा मुलगा आदित्य खोत, त्याचे मित्र सुरज जोंधळे, प्रविण काळे, राहुल येडगे अशा पाच जणांच्या टोळक्याने संगनमत कऊन, जानकर यांच्यावर तलवार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हात, कपाळवर तलवारीचे वार झाल्याने, तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी शहरातील एका ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची माहिती शाहूपूरी पोलिसांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घडल्या प्रकाराची जखमीकडून माहिती घेऊन, पाच संशयिताविरोधी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व संशयीताचा शोध सुऊ कऊन, सोमवारी दुपारी पाच संशयितांपैकी चौघा संशयितांना अटक करण्यास पोलिसांना यश आले, अशी माहिती शाहूपूरी पोलिसांनी दिली.








