वृत्तसंस्था/ बिजिंग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या बिजिंग खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पोलंडची द्वितीय मानांकीत खेळाडू इगा स्वायटेकने पटकाविले. अंतिम सामन्यात तिने रशियाच्या बिगर मानांकित सॅमसोनोव्हाचा पराभव केला.
महिला एकेरीच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्वायटेकने सॅमसोनोव्हावर 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. स्वायटेकने हा सामना 69 मिनिटात जिंकला. स्वायटेकचे डब्ल्यूटीए टूरवरील हे 16 वे विजेतेपद आहे. स्वायटेकने फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती.









