वृत्तसंस्था / मुंबई
येथे झालेल्या मुंबई खुल्या डब्ल्युटीए टूरवरील महिलांच्या 125 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत स्वीसच्या जिल टिचमनने एकेरीचे जेतेपद पटकाविले. तर भारताची प्रार्थना ठोंबरे आणि तिची हॉलंडची जोडीदार हार्टोनो यांनी महिला दुहेरीचे उपजेतेपद मिळविले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वीसच्या टिचमनने थायलंडच्या सेवांगकेयुचा 6-3, 6-4 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात प्रार्थना ठोंबरे आणि अॅरेनी हार्टोनो यांना रशियाच्या अॅनसेबा आणि प्रिडेनकिना यांच्याकडून 7-6 (7-4), 2-6, 10-7 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीतील विजेती टिचमनला या जेतेपदाबरोबरच 125 मानांकन गुण आणि 15500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. दुहेरीतील विजेत्या जोडीला प्रत्येकी 125 मानांकन गुण आणि 5700 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले.









