वृत्तसंस्था/ ड्युनेडिन
येथे सुरू असलेल्या फिफाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सलामीच्या सामन्यात स्वीत्झर्लंडने फिलिपिन्सचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून विजयी सलामी दिली.
या सामन्यात मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना स्वीत्झर्लंडचे खाते रेमोना बॅचमनने पेनल्टीवर उघडले. त्यानंतर सेरेना पीयुबेलने उत्तरार्धात दुसरा गोल करून फिलिपिन्सचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्याला सुमारे 13 हजार शौकीन उपस्थित होते.









