कोल्हापूर :
स्विमिंग हब फौंडशनतर्फे 25 व 26 जोनवारी रोजी तिसऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत राज्यासह देशातून 6 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली सहभागी होणार आहेत. स्पर्धेत व्यक्तीगत चॅम्पियनशीप, रोख रक्कम अशा 6 गटामध्ये सन्मान चिन्हे, मेडल्स व सहभागी स्पर्धकांना प्रशसतीपत्र दिले जाणार आहे. सदरची स्पर्धा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भरविली जाणार आहे. स्पर्धेत टच पॅड टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. स्पर्धा कदमवाडी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथील राष्ट्रीय खेळाडू सागर पाटील जलतरण तलाव येथे होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 ते 20 जोनवारी दरम्यान संपर्क साधावा व ऑनलाईन नोंदणीसाठी www.swimminghub.org या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








