दोनशेहुन अधिक स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव : आबा स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने कै. नारायणराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्या वतीने मुला-मुलींच्या जलतरणच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी या स्पर्धेत दोनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. गोवावेस येथील जलतरण तलावात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर व देशपातळीवर स्पर्धेक तयार होण्यासाठी यास्पर्धो भरविल्या जातात.या संस्थांचे प्रमुख माजी नगरसेवक नेताजी जाधव, श्रीधर (बापू) जाधव, माजी महापौर मालोजीराव आष्टेकर आणि आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विश्वासराव पवार, महापौर श्री मंगेश पवार यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, बाळासाहेब काकतकर, नगरसेवक नितीन जाधव, एड. महेश बेर्जे, गोपाळराव बिर्जे उपस्थित होते, यावेळी मान्यवरांचे स्वागत नेताजी जाधव, यांनी केले. बक्षीस समारंभवेळी म. ए. समितीचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे, एŸड. सुधीर चव्हाण, डॉ. समीर पोटे, युवा समितीचे अंकुश केसरकर, श्रीकांत कदम आदींच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजाराम सूर्यवंशी, मनोहर होसुरकर, प्रदीप शिट्टीबाचे, शंकर केसरकर, तानाजी शिंदे, विठ्ठल कंडगावकर, यशवंत देसाई, शाहू शिंदे, यल्लप्पा नागोजीचे, महेश दड्डीकर, बाबू कोले, बंडू बामणे, दिनेश मेलगे, शाहू शिंदे, अनिल आंबरोळे, शंकर केसरकर, सतीश शिंदे, पायल कदम उपस्थित होते.









