200 हून अधिकांना मिळणार शिबिराचा लाभ : 21 दिवस चालणार शिबीर
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
स्विमर्स व अॅक्वेरियस क्लब आयोजित 23 व्या दिव्यांग आणि वंचितांसाठीचे जलतरण शिबिराचे उद्घाटन उत्साहात जेएनएमसीच्या जलतरण तलावात झाले.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेव डॉ. शिवाजी कागणीकर, रमेश गंगूर, लता कित्तूर, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. 21 दिवस चालणाऱ्या या शिबिरात 200 हून अधिक मुले सहभागी होणार आहेत. त्यामध्ये दिव्यांग, अंध वंचितांसाठी हे मोफत शिबिर असणार आहे. या शिबिरात जवळपास 20 प्रशिक्षक या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. आतापर्यंत गेल्या 23 वर्षांत 5 हजारांहून अधिक जलतरणपटूंना प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामधील अनेक जलतरणपटू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविली आहे. त्यामध्ये राजेश शिंदे, मोहीद जुनेदी, उमेश खाडे, श्ा़dरीधर माळगी, सिमरन गुंडकल, अतिश जाधव, साहील जाधव, सुमित मुतगेकर, प्रज्वल नेर्लेकर आदी खेळाडूंचा समावेश आहे. या शिबिराला जयभारत फौंडेशन व एसएलके ग्रुप बेंगळूर व अॅलीड फौंड्रीज यांच्याकडून सहाय्य मिळत आहे.









