तीन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्यपदकांची कमाई
बेळगाव : सिंधुदूर्ग जिल्हा येथील अॅक्वेटिक असोसिएशन आयोजित 13 व्या आंतरराज्य सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी 3 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्यपदकांसह घवघवीत यश संपादन केले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चिवल बीचवर घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये शरण्या कुंभारने सुवर्ण, साहिल जाधवने सुवर्ण व वेदांत मिसाळेने सुवर्णपदक पटकाविले. निधी कुलकर्णीने रौप्य तर सुमीत मुतगेकर, व अनिश पै यांनी कांस्यपदक पटकाविले. तर फकिरप्पा के. ने चौथा क्रमांक, श्रीकांत देसाईने पाचवा क्रमांक, अनन्या पै व समीर मेणसे यांनी सहावा क्रमांक तर पाखी हलगेकरने नववा क्रमांक पटकाविला. वरील सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलगटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर व इम्रान उचगावकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.









